
Pimpri News : भाजप नगरसेविकेच्या शाई फेकीचा कर्मचारी महासंघाकडून निषेध
Pckhabar- भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकावर केलेल्या शाई फेकीचा महापालिका कर्मचारी महासंघाने
जाहीर निषेध केला आहे.
आशा शेडगे या कासारवाडी दापोडी प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका आहेत. प्रभागात सुरू असलेल्या रस्ते खोदाईसह काही समस्यांबाबत त्या महिला कार्यकर्त्यांसमवेत आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्याकरिता आल्या होत्या. मात्र आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वाची बैठक सुरू असल्यामुळे त्याना आयुक्तांची भेटू मिळू शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या आशा शेडगे यांनी आयुक्तांच्या कार्यालय बाहेर असलेल्या नाम फलकावर शाई फेक करत निषेध व्यक्त केला.
दरम्यान, भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी ही या प्रकाराचा निषेध केला आहे.










Leave a Reply