
Dehu News : भाजपचे अनोखे आंदोलन; सांडपाण्याचे प्रतिकात्मक पूजन करून नगरपंचायत प्रशासनाचा निषेध
Pckhabar- भाजपचे संतोष हगवणे यांच्या नेतृत्वामध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले भुयारी गटारच्या चेंबरमधून वाहणारे सांडपाण्याचे प्रतिकात्मक पूजन करून नगरपंचायत प्रशासनाचा महिलांनी निषेध नोंदवला.
सरकारी घरकुल परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून भुयारी गटार आणि सांडपाण्याची समस्या आहे. खूप वेळा देहू नगरपंचायत प्रशासनास लेखी तक्रार देवूनही कारवाई झाली नसल्यामुळे येथील महिलांनी सांडपाण्याचे प्रतीकात्मक पूजा पूजन केले. त्यानंतर सर्व नागरीक आणि महीलानी मोठ्या संख्येने नगरपंचायत कार्यालयात धरणे आंदोलन केले.
त्यावेळी गणेश खंडागळे यांनी निवेदन करून प्रास्ताविक सचिन मराठे यांनी केले.पूजा सरोदे, संगीता हगवणे, वैशाली रौंदळ, हेमा मोरे या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संतोष हगवणे यांनी भुयारी गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यावेळी सरकारी यंत्रणेला वेळोवेळी सुचना देवूनही बदल न केल्यामुळे ही समस्या भेडसावत आहे असे सांगितले.
तसेच येत्या पंधरा दिवसात समस्या निवारण झाले नाही तर कर कार्यालय कुलूप बंद आंदोलन करण्यात येईल, तसे पत्र प्रशासन प्रतिनिधी महेश वाळके यांना लेखी पत्राद्वारे दिली.
यावेळी बाळासाहेब काळोखे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, संदीप परंडवाल, शांताराम हगवणे, सुरेश हगवणे, महेश मोरे, नितीन महापुरे बालाजी झोंबाडे, सागर हगवणे, वसंत हगवणे, भरत रौंदळ, सचिन काळोखे, सुदाम मराठे, करवीर शिवलिंग, सत्यवान जाधव, योगेश हगवणे, किरण कांबळे आदी उपस्थित होते.











Leave a Reply