लाॅकडाऊनच्या ब्रेकनंतर महेंद्रसिंग धोनीने केली सरावाला सुरूवात

लाॅकडाऊनच्या ब्रेकनंतर महेंद्रसिंग धोनीने केली सरावाला सुरूवात
Pckhabar- ‘आयपीएल’च्या तेराव्या हंगामाचा मार्ग मोकळा झाला असून दि. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे जवळपास चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर ‘आयपीएल’च्या सरावाला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सुरवात केली आहे.

युएईमध्ये खेळवल्या जाणार्‍या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना 20 ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धोनीने बंद दाराआड सराव केल्याची माहिती झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

 धोनी गेल्या आठवड्यात जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये आला होता. त्यावेळी त्याने इन-डोअर सुविधांचा वापर करत सराव केला. त्याने बॉलिंग मशीनचा वापर करत फलंदाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *