Pimpri News :  आयुक्तांची भेट न झाल्यामुळे संतापलेल्या भाजप नगरसेविकेने आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली

Pimpri News :  आयुक्तांची भेट न झाल्यामुळे संतापलेल्या भाजप नगरसेविकेने आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली

नगरसेविकेसह 10 महिला कार्यकर्त्यां पोलिसांच्या ताब्यात

Pckhabar-पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट न होऊ शकल्याने  एका भाजप नगरसेविकेने आयुक्त कार्यालयाबाहेरील नामफलकावर शाई फेकून आपला संताप व्यक्त केला.

आशा शेंडगे असे या नगरसेविकेचे नाव आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

आशा शेडगे या कासारवाडी दापोडी प्रभागाच्या नगरसेविका आहेत. प्रभागात सुरू असलेल्या रस्ते खोदाईसह काही समस्यांबाबत त्या महिला कार्यकर्त्यांसमवेत आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्याकरिता आल्या होत्या. मात्र आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वाची बैठक सुरू असल्यामुळे त्याना आयुक्तांची भेटू मिळू शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या आशा शेडगे यांनी आयुक्तांच्या कार्यालय बाहेर असलेल्या नाम फलकावर शाई फेक करत निषेध व्यक्त केला.

हा प्रकार घडताच काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी आशा शेंडगे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना महापालिकेच्या आवारातून ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महापालिकेत एकच गोंधळ उडाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *