Pimpri News : काँग्रेस पक्षाच्या बदनामीकारक फ्लेक्सविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसात तक्रार
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात नुकतेच एक फ्लेक्स बॅनर महानगर पालिकेच्या समोर बीआरटी बसस्टॅाप वरील लोखंडी ग्रील वर लावण्यात आले होते त्या वर पिंपरी चिंचवड काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीबाबत अक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर लिहून तो जाहीर पणे दर्शविण्यात आला होता.
यात “तुम्ही दरोडेखोर, खुनी व खंडणीखोर आहात का ? तुम्ही पत्नी चा छळ करताय का ? तुम्ही व्याजाचा धंदा करता का ? तुन्ही कोणाचे पाहूणे आहात का ? तर मग तुम्हा पिपंरी चिचंवड शहर काँग्रेस अध्यक्ष व्हायच्या लायक नाही”
असा मजकूर लिहल्याने काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा गुन्हेगार, विकृत, अवैध व्यवसाय करणारा असतो असे म्हणणे कोणी एका अज्ञाताने जाहीर पणे मांडले आहे.
या वरून काँग्रेस पक्षाची बदनामी व काँग्रेस पक्षाचा शहर अध्यक्ष निवडीबाबात गंभीर वक्तव्य करण्यात आल्याचे दिसून येते व सदर बॅनरचा फोटो वृत्तपत्रातून ही छापून आला आहे.
वास्तविक पाहता असा निवडीबाबत निकषांचा कोणताही नियम काँग्रेस पक्षात नाही व निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर याबाबत पक्षाची नाहक बदनामी केल्याने या व्यक्ती बाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंपरी पोलिसांकडे रितसर कारवाई च्या मागणीसाठी तक्रार केली आहे.
या तक्रारपत्रावर नरेंद्र बनसोडे
(अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस) विरेंद्र गायकवाड
(अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस सेवादल)ॲड. उमेश खंदारे
(उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय)डॅा. वसीम ईनामदार
अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा एन एस यु आय) हिराचंद जाधव
(अध्यक्ष पिपंरी विधानसभा युवक काँग्रेस) नासीर चौधरी
(अध्यक्ष भोसरी विधानसभा युवक काँग्रेस) सौरभ शिंदे
(उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस) यांच्या सह्या आहेत.










Leave a Reply