Pimpri News : रयत शिक्षण संस्था केवळ शिक्षण देत नाही तर संस्कार, संस्कृती मूल्यांची विद्यार्थ्यांच्या मनात जोपासना करते : किसन रत्नपारखी

Pimpri News : रयत शिक्षण संस्था केवळ शिक्षण देत नाही तर संस्कार, संस्कृती मूल्यांची विद्यार्थ्यांच्या मनात जोपासना करते : किसन रत्नपारखी

कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेने आजच्या काळात ऑनलाईन शिक्षणात घेतलेली भरारी व रयत शिक्षण संस्था केवळ शिक्षण देत नाही. तर संस्कार व संस्कृती मूल्यांची देखील विद्यार्थ्यांच्या मनात जोपासना करते, असे प्रतिपादन
रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत सोमवारी गुणवंत विद्यार्थिनी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नपारखी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हनुमंत नेवाळे ( स्कूल कमिटी सदस्य कन्या विद्यालय) यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी किसन रत्नपारखी ( पश्चिम विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था सातारा) लाभले. तसेच अष्टावधानी संतुलन फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा जंजिरे व सदस्य गायत्री खेडकर , महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड , नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य उत्तम पाटील व उपमुख्याध्यापक प्यारेलाल शेख हे अतिथीगण लाभले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व सन्माननीय पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलनाने झाली .

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थिनींनी मिळविलेले यश व स्पर्धा परीक्षेतील यश याविषयी माहिती देऊन विद्यालयाची भविष्यातील विद्यार्थिनीच्या प्रगती विषयी धोरणे या विषयी माहिती दिली.

यानंतर शिक्षक दिनानिमित्त सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. व पुढे एस. एस. सी. परीक्षा 2020-21 मध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या 1) कु काळे गायत्री राजेंद्र (96.8%) 2)कु यादव भूमिका लहू(96.6%) (एम टी एस परीक्षेत पात्र )3) कु भोईटे रिया तुकाराम (95.4%) (एम.टी एस.परीक्षेत पात्र) 4) कु डफळ राधिका शशिकांत (90.8%) ( एम .टी. एस. परीक्षेत पात्र) विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचाही प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या प्रतिष्ठान तर्फे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला .

तसेच उपशिक्षिका फिसरेकर प्रीतम यांनाही राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला . त्याबद्दल शारदा शेटे व प्रीतम फिसरेकर यांचा विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनाही विश्वभान प्रतिष्ठित तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सन्मान करण्यात आला. यानंतर सायन्स ऑलीम्पियाड स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला .

तसेच या परीक्षेला मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या उपशिक्षिका मनिषा निकम व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर विद्यालयातील उपशिक्षक काकडे एस ए यांनी अटल टिंकरिंग ऑन लाईन प्रोग्राम मध्ये सहभाग नोंदवला बद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अष्टावधानी संतुलन फाउंडेशन यांच्या वतीने एस .एस.सी. परीक्षेत प्रथम व गणित विषयात प्रथम आलेली विद्यार्थिनी कु काळे गायत्री राजेंद्र हिला एकूण रुपये 7000 रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच इयत्ता 10 वी ब या वर्गातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु काळे प्रभावती गजानन हिला रुपये 2000 रोख रक्कम , व इयत्ता 9 वी ब या वर्गातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु यादव नंदिनी लहू हिला रुपये 1000 रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर उपशिक्षक काकडे सर यांनी कैलासवासी लक्ष्मण वाखुरे यांच्या स्मरणार्थ मिळविलेल्या देणगीतून 15 गरजू विद्यार्थिनीना शालेय गणवेश देण्यात येणार आहेत त्यातील प्रतिनिधिक स्वरूपात कु गायकवाड सृष्टी गौतम हिला शालेय गणवेश देण्यात आला . तसेच एस. एस .सी .परीक्षा 2020 -21संस्कृत विषयात 100/ 100 गुण मिळविणाऱ्या कु रिया तुकाराम भोईटे हिला उपशिक्षिका अनघा रांगणेकर यांच्या वतीने रुपये 500 रोख रक्कम देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपशिक्षिका शुभांगी दोरगे यांनी त्यांचे वडील कै. अप्पासाहेब वाघेरे यांच्या स्मरणार्थ समाजसास्त्र व मराठी विषयात प्रथम आलेली विद्यार्थिनी कु यादव भूमिका लहू हिला रुपये 1000 देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपशिक्षक राऊत आर एम यांच्या वतीने इयत्ता 10 वी ब मध्ये प्रथम आलेली कु काळे प्रभावती हिला रुपये 500 व समाजशास्त्र विषयात 100 /100 गुण मिळवून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु यादव भूमिका हिला रुपये 500 बक्षीस रूपाने देण्यात आले .

यानंतर विद्यालयातील उपशिक्षिका साकोरे मीनल यांनी मराठी साहित्यात केलेल्या लेखनाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांना 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यानंतर अतिथी मनोगतामध्ये महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ .पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थिनींनी निश्चित ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे मार्गदर्शन केले. यानंतर अष्टावधानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हेमा जंजिरे यांनी शालेय जीवनातील अनुभव व गुरू शिष्य नाते याविषयी माहिती दिली.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्कूल कमिटी सदस्य हनुमंत नेवाळे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक कार्य व आजची शिक्षण पद्धती तसेच शाखेचा इतिहास याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी व्यक्त केले. व सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका अनघा रांगणेकर. यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *