ICC T20 World Cup : धोनी पुन्हा जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्डकप?

ICC T20 World Cup : धोनी पुन्हा जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्डकप?

बीसीसीआयची मोठी घोषणा!
Pckhabar-पुढील महिन्यात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेमींसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचे कमबॅक झाले आहे.

ओमान आणि यूएईमध्ये भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील टीम इंडियासोबत असणार आहे.  धोनीनं आयपीएल वगळता  सर्व क्रिकेट प्रकारांमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो टीम इंडियामध्ये नेमकं काय करणार आहे? याची उत्सुकता धोनीच्या चाहत्यांना लागली होती. त्यासंदर्भात बीसीसीआयनं मोठी घोषणा केली आहे.

भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय टीमसोबत वर्ल्डकपमध्ये असणार आहे. यंदाच्या T20 World Cup मध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानावर खेळणारा धोनी जरी पाहता येणार नसला, तरी मैदानाबाहेर राहून रणनीती आखणारा  धोनी  पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *