T20 ICC World Cup : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
Pckhabar- युएई आणि ओमानच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने आज (बुधवार) कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
17 आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे.

सूर्यकुमार यादव याला संघात स्थान देण्यात आले आहे. फिरकीपटूंमध्ये अश्विन तर रिषभ पंतच्या जोडीला ईशान किशनला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून या दोन्ही संघाशिवाय न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांचाही या गटात समावेश आहे.
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर










Leave a Reply