Talegan Dabhade News: जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाला यश; दिव्यांग लाभार्थ्यांना दोन महिन्याचे अनुदान मिळाले

Talegan Dabhade News: जनसेवा विकास समितीच्या आंदोलनाला यश;
दिव्यांग लाभार्थ्यांना दोन महिन्याचे अनुदान मिळाले
Pckhabar- जनसेवा विकास समितीच्या
पुकारलेल्या ठिय्या आंदोलनामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने  338 दिव्यांग लाभार्थ्यांना  दोन महिन्याचे अनुदान त्वरित बॅक खात्यावर जमा झाले आहे. यामुळे सणासुदीच्या काळात  दिव्यांग लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार) पुकारलेल्या आंदोलनात  माजी नगराध्यक्ष सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, बांधकाम समितीचे सभापती  निखिल भगत, नगरसेवक रोहित लांघे, समीर खांडगे, माजी नगरसेवक सुनील कारंडे,जनसेवा प्रवक्ते मिलिंद अच्युत,समाज कल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर दिघे, आशिष खांडगे, कल्पेश भगत, दिव्यांग  संघटनेचे व जनसेवा विकास समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे
जून, जुलै व ऑगस्ट  या 3 महिन्यांचे अनुदान रखडले होते. दिव्यांगाचे अनुदान त्वरित देण्याच्या मागणीसाठी जनसेवा विकास समितीने नगर परिषद सभागृह येथे  ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनामुळे ३३८ दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे एकूण २० लाख २८ हजार रुपये नगर परिषदेने जमा  केले.

यावेळी किशोर आवारे म्हणाले ”साडेतीन कोटींची बिले काढण्यासाठी नगरपरिषदेकडे पैसे आहेत.  मात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी पैसे नाही ही शोकांतिका आहे”.

विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी जनसेवा विकास समितीने दिव्यांगांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

प्रस्ताविक कल्पेश भगत यांनी केले. सूत्रसंचालन प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले. आभार बांधकाम समितीचे सभापती  निखील भागत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *