Dehu Crime News : जागा विकून पैसे देण्याची मागणी करत वृध्द आईला लाकडाने मारहाण
दोन मुलांवर गुन्हा दाखल
Pckhabar- ‘जागा विकून पैसे दे नाहीतर मी तुला मारून टाकीन’ अशी आईला धमकी देत शिवीगाळ करत लाकडाने मारहाण करणार्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी 11 वाजता देहूगाव येथे घडला.
याप्रकरणी अनुसया सुदाम मोरे (वय 65, रा. कंदपाटील नगर, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कांतीलाल, आकाश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांतीलाल आणि आकाश हे फिर्यादी यांची मुले आहेत. कांतीलाल याने फिर्यादी यांना ‘तू राहती जागा विकून मला पैसे दे. नाहीतर मी तुला मारून टाकीन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी जागा विकण्यास नकार दिला. यावरून आरोपी आकाश याने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी त्यांचा धाकटा मुलगा कैलास मध्ये आला असता आरोपी कांतीलाल याने कैलास यांना देखील लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.










Leave a Reply