Rain News : पुढचे चार दिवस पावसाचे!

Rain News : पुढचे चार दिवस पावसाचे!
Pckhabar-पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचे पुर्नरागमन झाले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही नद्यांना पुर आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर काही भागाचा संपर्क तुटला आहे.

कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण राज्य पावसाने व्यापले आहे. पुढील चार दिवस राज्यात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारच्या मध्यरात्रीपासून कोकणात ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. जोरदार पावसाच्या सातत्यामुळे कोकणात हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला होता. तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा, अन्यथा पाऊस थांबेपर्यंत घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर कोकणात ठिकठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. अशी माहिती हवामान विभागाने दिली.

पुणे शहर आणि परिसरात ठिकठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. येत्या सोमवारपर्यंत पावसाचा मुक्काम कायम असणार आहे. जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *