Dehu News: अभंग प्रतिष्ठानतर्फे गुणवंत शिक्षक, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

 

Dehu News: अभंग प्रतिष्ठानतर्फे गुणवंत शिक्षक, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान
Pckhabar-अभंग प्रतिष्ठान आयोजित गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा आज (मंगळवार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देहूगाव याठिकाणी संपन्न झाला.

या सन्मान सोहळ्या अंतर्गत देहूगाव गटातील सर्व अंगणवाडी शिक्षिका, सहशिक्षिका व देहूगाव, माळीनगर,विठ्ठलवाडी, बोडकेवाडी येथील प्राथमिक विद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनींचा गुणवंत शिक्षक सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आला.

याशिवाय कोरोनाच्या संकटकाळात आदर्श कार्य करणारे पत्रकार बांधव श्री.राजेंद्र काळोखे, श्री रामकुमार अगरवाल, श्री. रमेश कांबळे, श्री. मंगेश पांडे, श्री. मुकुंद परंडवाल यांचा आदर्श पत्रकार म्हणून विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी आप्पासाहेब पटवर्धन तंत्रनिकेतनच्या संचालिका,समाजसेविका डॉ. शिल्पाताई नारायणन्- म्हापुस्कर, केंद्रप्रमुख श्री.अशोकराव ससाणे सर, राष्ट्रीय खेळाडू,आदर्श शिक्षक श्री. नंदकुमार काळोखे, मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण जढर सर, मुख्याध्यापक श्री.शिवाजी विटकर सर, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रवीण काळोखे, सचिव सलीम मुलाणी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी डाॅ.शिल्पाताई म्हापुस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,”अंगणवाडी व प्राथमिक शिक्षकांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. लहान मुलांना शिकवणे त्यांना घडविणे हे अवघड कार्य अतिशय कल्पकतेने,
सेवाभावनेने व समर्पित भावनेने करणारे हे आदर्श शिक्षक आहेत. या शिक्षकांचा सन्मान निश्चितपणे त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यास प्रेरणा देणारा आहे. आपल्या सर्वांच्या मनातील शिक्षकांविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. विद्यार्थी जीवनाच्या मंदिराचा पाया याच शिक्षकांच्या हातून घडत असतो म्हणूनच या सर्व शिक्षकांचे कार्य महान आहे” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. केंद्रप्रमुख श्री. अशोकराव ससाणे सर यांनी अभंग प्रतिष्ठानच्या या गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्याचे मनापासून कौतुक आपल्या शब्दात व्यक्त केले.

सर्व शिक्षकांनी हा अभंग सन्मान आम्हास भावी कार्यास नित्य प्रेरणा देणारा आहे अशा भावना अगदी आनंदाने व्यक्त केल्या. शिक्षकांच्या वतीने श्री.नरवडे सर, श्री.हगवणे सर, सौ.गोरडे मॅडम व पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार श्री. राजेंद्र काळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नारायण पचपिंड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विकास कंद यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षकांच्या वतीने श्री.किशोर भोसले सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री.सागर मोरे, दिनेश साळुंखे, श्री. सचिन काळोखे,श्री. विजय मोरे, श्री.अजिंक्य साकोरे, प्रा. विक्रम भोईटे, श्री.सागर भसे, विनायक गोलांडे, श्री.योगेशभाऊ काळोखे, श्री.धनंजय मुसुडगे व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *