Maharashtra News: 1 नोव्हेंबरपासून College सुरू करण्याचा विचार : उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
Pckhabar- राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार असून 1 नोव्हेंबरपासून College सुरू करण्याचा विचार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं त्यासंबंधीची माहिती दिली जाईल” असं उच्च शिक्षणमंत्री सामंत यांनी म्हंटलं आहे.
त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत. कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय जरी घेण्यात आलं असला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण झालं असणं महत्त्वाचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांचं किती टक्के लसीकरण झालंय हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.










Leave a Reply