Wakad crime news: महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शोरूम मॅनेजरवर गुन्हा
Pckhabar- शोरूममध्ये कोणी नसताना कार्यालयात बोलवून घेत हात धरून शरीर सुखाची मागणी करून लाॅजवर चल, असे बोलून कर्मचारी महिलेचा विनयभंग करणाऱ्या शोरूम जनरल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथील साईबाबा ॲटो हिल्स प्रा. लि. येथे घडली.
याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार साईबाबा ॲटो हिल्स प्रा. लि. चे
या शोरूमचे जनरल मॅनेजर युवराज पायगुडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी या वाकड येथील साईबाबा ॲटो हिल्स प्रा. लि या शोरूममध्ये कामाला आहेत. आरोपी हा जनरल मॅनेजर असून
कोणी नसताना फिर्यादी यांना कार्यालयात बोलवून घेत होता. वाईट नजरेने बघत होता. त्यांचा हात धरून शरीर सुखाची मागणी करून लाॅजवर चल, असे बोलून त्यांचा विनयभंग केला.
पोलीस उपनिरीक्षक दिवटे अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply