Hinjawadi Crime News: स्वस्तात प्लॉट खरेदी करून देण्याचे आमिष; सात जणांना 72 लाखांचा गंडा
Pckhabar-स्वस्तात प्लॉट खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एकाने सात जणांकडून टोकन म्हणून पैसे घेत प्लॉट खरेदी करून दिले नाहीत. सात जणांची तब्बल 72 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत मारुंजी येथे घडला.
याप्रकरणी मयुर ज्ञानेश्वर कुंभार (वय-28, रा, शिव कॉलनी, गणेश नगर, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संजय मारोतराव फुलझले (वय-44, रा. प्लॉट ने ११०४ पुराणिक आदित्या फेज-05 बाणेर रोड, हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार यांच्या सह सात जणांना आरोपीने स्वस्तात प्लॉट खरेदी करून देण्याचे आमिष दाखविले. दिलीप चव्हाण यांच्याकडून 4 लाख, श्रीमती. शोभा राजु सांळुके यांच्याकडून 10 लाख, गुलाब नामदेव झारगड यांच्याकडून 10 लाख 1 हजार, आनंद भास्कर वाघमारे यांच्याकडून 6 लाख 11 हजार, मंदार अप्पासाहेब शिरसागर
यांच्याकडून 25 लाख, मोहम्मद साकुर फसवणुक यांच्याकडून 10 लाख 51 हजार, पृथ्वीनाथ प्रभुनाथ यांच्याकडून 2 लाख 51 हजार रुपये, फिर्यादी कुंभार यांच्याकडून 4 लाख असे 72 लाख रुपये प्लाॅटसाठी टोकन म्हणून वेळोवेळी पैसे घेतले. प्लॉटची खरेदीखत न करता पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांची आर्थिक फसवणुक केली.
पोलीस उपनिरीक्षक काकडे अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply