Akurdi News: शिक्षकांनी सारथी बनले पाहिजे : कुलगुरू डॉ. करमळकर
Pckhabar-शैक्षणिक क्षेत्रात नवनिर्मिती होताना दिसत आहे. आज घेतलेले शिक्षण भविष्यात उपयोगी पडेलच का अशा संभ्रमात विद्यार्थी आहे. अशा वेळेस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिशा दाखवावी. केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सारथी बनले पाहिजेत. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनानिमित्ताने आकुर्डी येथील डॉ. डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या
पीएचडी प्राप्त १३ प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी डीवायपाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, शैक्षणिक संकुल संचालक डॉ निरज व्यवहारे, डॉ. डीवाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन आणि सर्व प्राचार्य यावेळी उपस्थित होते.
डॉ.करमळकर पुढे म्हणाले कि, शिक्षक म्हणजे संस्कार,संवाद,एक विचार, करुणा,सृजनशीलता,ममता,माया,संयम,सजगता, सदाचार या गुणांचा खजिना आहे. मि गेली ३० वर्षे विद्यार्थी घडविण्यात घालविल्याने मला खूपच आनंद होतो.
खासगी विद्यापीठाना स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे.
आज औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजेत. हे होत नसल्याने शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात एक दरी निर्माण झाली असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.शैक्षणिक संकुलातील असलेल्या पायाभूत सुविधांचे
कुलगुरू यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.
आपल्या स्वागतपर भाषणात संचालक डॉ. नीरज व्यवहारे यांनी आकुर्डी कॅम्पसबद्दल माहिती दिली. आणि सर्व शैक्षणिक संस्थाच्या प्रगतीची माहिती दिली.
डॉ. डी. वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन म्हणाले की, संशोधन हाच आपल्या शैक्षणिक व्यवस्थेला भक्कम बनवण्याचा एकमेव मार्ग आहे.
श्री.तेजस पाटील म्हणाले कि, कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मानसिक आरोग्य सांभाळले पाहिजेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शलाका पारकर यांच्या केले तर
आभार डॉ.विजय वाढई यांनी मानले.
संस्था उपाध्यक्ष सतेज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.










Leave a Reply