Dehu News : संत तुकाराम आणि संत जिजाबाई कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

Pckhabar- देहूगाव येथील संत तुकाराम विद्यालय आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ’शिक्षक दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

  शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे माजी विभागीय अधिकारी श्री. निम्हण सर, संत तुकाराम विद्यालयाचे  मुख्याध्यापक  प्रल्हाद परशुराम, उपमुख्याध्यापक कबीर भंडारे, पर्यवेक्षक विद्या कांबळे, संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका सुनंदा वडाळकर, पर्यवेक्षक आनंदराव तांबे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांंविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला.  विद्यालयामध्ये या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता कांबळे यांनी केले. फोटोग्राफी सुरेश शिंदे यांनी तर आभार कबीर भंडारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *