Talwade News : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या घरी जावून सन्मान

Talwade News : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या घरी जावून सन्मान

शिवयोद्धा प्रतिष्ठाण, अमोल भालेकर मित्र परिवारातर्फे उपक्रम

Pckhabar- शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शिवयोद्धा प्रतिष्ठाण व अमोल भालेकर मित्र परिवार यांच्या वतीने रुपीनगर, तळवडे परिसरातील शिक्षकांचा घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला. परिसरातील 41 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असुन प्रत्यक्ष घरी येवुन मिळालेल्या मानवंदनेमुळे शिक्षकांकडुन या उपक्रमाबाबत आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शिवयोद्धा प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार रुपीनगरमधील सर्वच शिक्षकांचा गुलाबपुष्प आणि विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती भेट देत सन्मान करण्यात आला.

याबाबत माहिती देताना शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल भालेकर म्हणाले ”संपूर्ण देशात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन (Teacher’s Day) साजरा केला जातो. आपापल्या परीने शिक्षकांप्रती असलेले आपले प्रेम आणि आदर विद्यार्थी व्यक्त करतात. एवढंच नाहीतर जगभरातही शिक्षक दिवस म्हणजेच Happy Teachers Day मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमधे आयुष्यभर पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी आणि ज्ञानदानाचे काम शिक्षक करत असतात”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *