Pawana Dam News : ऐका हो.. ऐका…पवना धरण शंभर टक्के भरले!
वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पवना धरण परिसरात 24 तासात 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड, मावळवासियांच्या आणि शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पवना धरण परिसरात 1 जूनपासून 2 हजार 215 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 1595 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 100 टक्के इतका तर यावर्षी 190 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 0.86 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 68.14 टक्के पाणीसाठा वाढला आहे.
दरम्यान, धरण शंभर टक्के भरल्याने पावसाचा जोर वाढल्यास पवना नदी पात्रात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *29मि.मि.*
💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *2215मि.मि.*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 1595
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *100% टक्के*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 100% टक्के*
💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *0.86% टक्के*
💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *68.14% टक्के*










Leave a Reply