Pune News : राजू शेट्टी यांचे नाव राज्यपाल नियुक्त यादीतून वगळले नाही : ज्येष्ठ नेते शरद पवार
Pckhabar- राष्ट्रवादीने शब्द पाळला आहे. राजु शेट्टी यांचे कृषी व सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी नाव दिले आहे. अतिम निर्णय झालेला नाही. मात्र राष्ट्रवादीने शेट्टी यांचे नाव वगळले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (शनिवार) पुण्यात स्पष्ट केले.
कोथरूडमध्ये भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूलचे ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दल मागच्या दोन दिवसांपासुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांचे नाव वगळल्याच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले की, राज्यपालांकडे दिलेल्या यादीतून आम्ही राजू शेट्टी यांचे नाव वगळले नाही. ते नाराज असतील याची मला माहिती नाही. आम्ही जे नाव राज्यपाल यांना दिली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी शेती व सहकार क्षेत्रात काम केलं आहे, म्हणुन त्यांना घ्यावं अस सागितले आहे. अजून त्यावर निर्णय झाला नाही. मी दिलेला शद्ब पाळला आहे. राजू शेट्टी यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
पवार पुढे म्हणाले” दिल्लीत 14 महिने शेतकरी आंदोलन करतायत. ही सरकारची असंवेदनशीलता आहे. ईडीसारख्या यंत्रणांचा समावेश विरोधकांना नमवण्यासाठी होतोय. हे फक्त महाराष्ट्रात होतयं असे नाही तर इतर राज्यातही होतोय.
मंदिरे खुली करण्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधे याबाबत सुसंवाद आहे. केंद्र सरकारच्या विचारांची जी राज्यात लोकं आहेत त्यांनी तारतम्य बाळगण्याची गरज, असेही पवार म्हणाले.










Leave a Reply