Pune District News :   लसीकरण मोहिमेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

Pune District News :   लसीकरण मोहिमेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

Pckhabar-बजाज ग्रुप,covid-19 मेगा लसीकरणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा  उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 31 ऑगस्ट 2021 रोजी बजाज covid-19 मेघा लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. बजाज कंपनी कडून 150000 कोविशिल्ड लसीचे डोसेस आणि त्यासाठी लागणाऱ्या एक लाख 77 हजार ए डी सिरिजेस उपलब्ध करून दिल्या. त्याच बरोबर लसीकरणानंतर फोटो काढण्यासाठी 500 सेल्फी स्टॅन्ड व लसीकरणा विषयी माहिती देणारे 500 स्टॅन्ड बजाज कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शासनाकडील उपलब्ध करून देण्यात आलेली कोविशिल्ड लस अशी एकूण 2,54,263 लाभार्थ्यांना एकाच दिवसात संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा लसीचाडोस देऊन लसीकरणाच्या इतिहासातील नाविन्यपूर्ण विक्रम करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 559 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते, व त्यात 2236अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमे करता ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा काल शुक्रवारी पुणे जिल्हा परिषद कार्यालयात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष्य प्रसाद,  जिल्हा परिषद अध्यक्षा  निर्मला पानसरे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय रणजित शिवतरे, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती  प्रमोद काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार व इतर सर्व जिल्हा परिषदेचे मान्यवर पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत  कार्यक्रम पार पडल्याची माहिती जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय घाटे यांनी दिली

सर्वसाधारण बिगर आदिवासी भागातील क्षेत्र

1)लोणावळा नगरपालिका रुग्णालय
2)प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर
3)महिला रुग्णालय,बारामती
4)आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रांजणी उपकेंद्र तसेच

आदिवासी दुर्गम क्षेत्रात

1) आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर,अंतर्गत तेरुंगण
2)जुन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,आपटाळे,अंतर्गत पाडळी
3)खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, डेहणे,अंतर्गत नायफड उपकेंद्र इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *