Sangvi crime news: वायरिंगच्या कामाला आले.. अन् घर साफ करून गेले
Pckhabar- घरातील खराब झालेली वायरिंग बदलण्यासाठी आलेल्या कामगारानींच घरातील तिजोरीवर हात साफ करत साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
याप्रकरणी शिवराज देविदास घाटोळ (वय 33, रा. कास्टालिया सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सर्व्हिस मार्केट या कंपनीच्या कामगारांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज यांच्या घरातील खराब झालेली वायरींग बदलण्यासाठी सर्व्हिस मार्केट या कंपनीतून कामगार आले. आलेल्या कामगारांपैकीच कोणी तरी फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून 1 लाख 90 हजार रोख रक्कम आणि 37.5 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.










Leave a Reply