वडगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक
Pckhabar- वडगाव मावळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी येत्या मंगळवारी (दि 11) निवडणूक होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिली. या पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र कोणाला संधी मिळणार हा औत्सुक्याचा विषय आहे.
उपनगराध्यक्षा माया चव्हाण यांनी कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी मंगळवारी नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन निवडणूक घेण्यात येणार आहे.
नगरपंचायतमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व अपक्ष अशा महाविकास आघाडीची सत्ता आहे. या आघाडीकडे नऊ तर भाजपाचे सात व एक अपक्ष असे मिळून आठ सदस्य आहेत.
मतदान करण्याची गरज भासल्यास नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या एका मताची भर पडते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे बलाबल जास्त आहे.
दि 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, 12 ते 12.15 पर्यंत छाननी, 12.15 ते 12.30 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत व दुपारी 12.30 निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.










Leave a Reply