Pimpri News: लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली योगेश बहल यांच्या कार्याची दखल
Pckhabar-कोरोना संकटकाळात निरपेक्ष आणि प्रामाणिक सेवा करून असंख्य रुग्णांना या जीवघेण्या आजारापासून वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे राष्ट्रवादीचे माजी महापौर नगरसेवक योगेश बहल यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने बहल यांचा नुकताच गौरव केला आहे.
ईश्वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, या संस्थेचे अध्यक्ष तसेच पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
कोरोना संकटकाळात रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या कोव्हीडयोद्धयांना हे प्रमाणपत्र दिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निर्देश केल्याप्रमाणे करोना व्हायरस रोगाच्या सर्वोत्तम प्रतिबंधासाठी मार्गदर्शन तसेच कार्य करणाऱ्या योगेश बहल यांना हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.










Leave a Reply