Pimpri News : नागरिकांच्या कररूपी पैशांवर भाजपचा डल्ला : उपमुख्यमंत्री अजित पवार
Pckhabar- स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची स्वप्ने जनतेला दाखवून भाजप महापालिकेत सत्तेवर आला. मात्र, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाला अटक होण्याची घटना प्रथमच घडली आहे. नागरिकांच्या कररूपी पैशांवर कसा डल्ला मारला जात आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय नागरिकांना गत्यंतर राहिलेले नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) केली.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री. गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित, चिंचवड येथील नूतन वास्तूचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, शाम लांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
लाच प्रकरणात अडकलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा भाजपने अद्यापही राजीनामा घेतला नाही. याबाबत, पत्रकारांनी पवार यांना विचारले होते.
पिंपरी-चिंचवड ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी तसेच शहराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पवार म्हणाले.










Leave a Reply