Dehu News : ऑनलाईन योग वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या 41 साधकांचा प्रमाणपत्र देवून गौरव
Pckhabar- योग विद्या धाम नाशिक संस्थेचे योग विद्या धाम देहूगांव शाखेचे वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन योग वर्गाला साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्र सरकारच्या योग प्रमाणिकरण मंडळाचा लेवल 2 आणि 3 चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या देहूतील 11 साधक ऑणि ऑनलाईन योग वर्ग अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या 30 साधकांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
देहूगाव येथील धर्मशाळा हनुमान मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमास योगाचार्य प्रमोद निफाडकर, ज्येष्ठ मार्गदर्शिका ऐश्वर्या जोशी, देहूगांव केंद्रप्रमुख दत्तात्रय भसे, डॉ. शिल्पा नारायणन-मापुसकर, प्रा.आ. केंद्रांचे मुख्य वैद्यकिय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव, अॅड. संतोष भोसले, श्री टांकसाळे उपस्थित होते.
देहू शाखेच्या वतीने डॉ. शिल्पा नारायणन मापुसकर यांनी ऑनलाइन योग प्रवेश वर्गात सहभागी झालेल्या साधकांना मार्गदर्शन केले.
या योग वर्गात डॉक्टर, वकिल, तसेच दिल्ली येथील एका साधकानेही भाग घेतला होता. विश्व कल्याण प्रार्थना आणि ओंकार जपाने कार्यक्रमाची सांगता झाली.










Leave a Reply