Pimpri News : ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रमा अंतर्गत कन्या विद्यालयातर्फे
विद्यार्थिनींना घरी जाऊन मार्गदर्शन
Pckhabar- ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे विद्यालयातील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. सृष्टी गौतम गायकवाड व इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. श्रुती गौतम गायकवाड या विद्यार्थिनींना मोबाईल उपलब्ध नसल्याने घटक चाचणी क्रमांक 1 सोडवता आली नाही. त्यांच्या घरी विश्वशांती कॉलनी गावठाण येथे जाऊन ,मोबाईल देऊन घटक चाचणीचे पेपर सोडवून घेतले. तसेच त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन केले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन अभ्यास सर्वच विद्यार्थ्यांना जमत नाही. काही विद्यार्थ्यांच्या कडे अँड्रॉइड मोबाईल नाही. काही घरांमध्ये दोन-तीन भावंडं असतात. त्यामुळे त्यांना ऑनलाईन तासाला जॉईन होता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या विद्यालयातील शिक्षक शिक्षिका परिसरातील अशा गरजू विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतात.
या उपक्रमाअंतर्गत कन्या विद्यालयातील सौ साकोरे एम डी, सौ. फिसरेकर पी ए आणि श्रीमती काकडे आर आर यांनी गृह भेट दिली.
यासाठी त्यांना कन्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शेटे एस एस व पर्यवेक्षिका सौ पाटील यु बी यांनी मार्गदर्शन केले.










Leave a Reply