Dehuroad News : देहूरोड पूल वाहतुकीसाठी लवकरात-लवकर खुला करा: माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

Dehuroad News : देहूरोड पूल वाहतुकीसाठी लवकरात-लवकर खुला करा: माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
Pckhabar- देहूरोड रेल्वे उड्डाणपूलाचे गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. या पुलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे या दोन्ही लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या पुलाच्या कामाची माजी राज्यमंत्री, भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी अधिकारी आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांसमवेत आज (गुरूवार) पाहणी केली. तसेच पूलाचे रखडलेले काम लवकरात-लवकर पुर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सूचना भेगडे यांनी अधिकार्‍यांना दिली.

  याप्रसंगी देहूरोड भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, देहूरोड कॅन्टोन्मेंट नगरसेवक रघुवीर शेलार, कैलास पानसरे, नगरसेवक राहुल बालघरे, विशाल खंडेलवाल, नगरसेविका सारिका नाईकनवरे, मदन सोनिगरा, अमोल नाईकनवरे, संजय पिंजण, रवींद्रमामा शेलार, सूर्यकांत सुर्वे, उमाशंकर सिंग, अंजनी बत्तल, सारिका मुथा, एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

देहूरोड येथील रेल्वे पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशा सूचना भेगडे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. लॉकडाउनच्या काळात रेल्वे प्रशासन असेल एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांनी उड्डाणपुलाच्या कामाला गती देऊन प्रगतीपथावर आणल्या बद्दल त्यांचे भेगडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *