लोणावळ्यात कोरोना बधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर

लोणावळ्यात कोरोना बधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर
 Pckhabar- : येथील वलवण गावात सहा जणांचे तर तुंगार्ली आणि प्रधान पार्क येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे शुक्रवारी लोणावळा शहरात आढळून आलेल्या कोरोना बधितांची संख्या 8 झाली आहे. तर लोणावळा शहरातील एकूण बधितांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोचली असून 99 झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वलवण गावातील या सहाही रुग्णांच्या चाचण्या खाजगी लॅब मध्ये करण्यात आल्या होत्या. या सहा बधितांमध्ये एक 70 वर्षीय व दुसरा 40 वर्षीय अशा दोन व्यक्ती, एक 12 वर्षीय मुलगा आणि एक 67 वर्षीय, दुसरी 65 वर्षीय आणि तिसरी 40 वर्षीय अशा तीन महिलांचा समावेश आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 28 वर्षीय कोरोना वारीयर्स पोलीस कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे. सदर कर्मचारी तुंगार्ली येथील रहिवासी असून लोणावळा बाजारपेठे जवळील प्रधान पार्क सोसायटीमध्ये एका 76 वर्षीय जेष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोना बधितांची संख्या 99 झाली आहे. यातील आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 40 झाली आहे तर सक्रिय रुग्णसंख्या 55 इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यत शहरातील 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *