Bhosari News : सायकल रॅलीतून मनसेचा स्वच्छतेचा संदेश
Pckhabar- मॅविक सायकल क्लबच्या माध्यमातुन श्रावण महिन्यानिमित्त श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिर ते श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर तब्बल 115 कि.मी. प्रवास पुर्ण करुन पर्यावरण पूरक सायकल फेरीतून स्वच्छता संदेश देत प्लास्टिक मुक्त भिमाशंकर हा उपक्रम राबवण्यात आला.
या फेरीची सुरुवात चर्होली चौकपासुन सायकलपटूच्या टि शर्टचे अनावरण करुन उदघाटन करण्यात आले. झेंडा दाखवून फेरीची सुरुवात करण्यात आली. निसर्गरम्य भिमाशंकर अभयरण्यातील व महादेव मंदिर परिसरातील घनकचरा व प्लास्टिक बाटल्या, वेपर्स पाकिटे कचरा मोठ्या प्रमाणात जमा केला. या मनसे स्वच्छता सायकल फेरीचे आयोजन मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी केले होते.
यावेळी मनसे शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले, हेमंत डांगे, बाळा दानवले, विशाल मानकरी, सुशांत साळवी, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, शिवकुमार लोखंडे, दिग्गविजय गवस, हेमंत तिवारी, इब्राइन शेख आदी मान्यवर उपस्थीत होते.
याफेरीमध्ये सायकलपटू दत्ता घुले, मयूर पिंगळे, जुनेद मुलाणी, ओंकार राऊत, प्रतिक जेले, कुलदिप कोकाटे, सौरभ खोत आदी सहभागी झाले होते.










Leave a Reply