Sangvi Crime News : व्यावसायिकांकडून खंडणी उकळणार्‍या दोन तोतया पोलिसांना अटक

Sangvi Crime News : व्यावसायिकांकडून खंडणी उकळणार्‍या दोन तोतया पोलिसांना अटक
Pckhabar-पोलीस आणि बँकेचा ड्रोस कोड घालून व्यावसायिकांना  गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणार्‍या दोन तोतया पोलिसांना  सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सांगवीतील सृष्टी चौकात घडला.

बुध्दभुषण अशोक कांबळे (वय-27, रा. म्हेत्रे वस्ती, टॉवर लाईन, चिखली), औदुंबर भारत जाधव (वय-29, रा. कासारवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद विठ्ठल गोडे (वय-34, रा. सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे सांगवी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी पोलीस आणि बँकेचा ड्रोस कोड घालून व्यावसायिकांना  गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळत होते.  याबाबत फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी आरोपीला हटकले. आरोपींनी मी पोलीस उप निरीक्षक आहे. एस. बी. आय. बँकेत क्रेडीट मॅनेजर असल्याची बतावणी केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *