Sangvi Crime News : बॅकेच्या मॅनेजरला पिस्तूल दाखवून लुटले
Pckhabar- राहत्या घराच्या इमारतीसमोर दोघांनी एका बँक मॅनेजरला पिस्तूलसारख्या हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 1 हजार रूपये आणि बँकेचे आयकार्ड काढून घेतले. तसेच त्यांच्या मोटारीची काच फोडून 10 हजार रूपयांचे नुकसान केले. ही घटना पिंपळे गुरव येथे बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
अनिकेत ऊर्फ उर्या आकाश ऊरणकर (वय-21, रा. खडकी), विघेश गुणशीलन रंगम (वय-22, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बॅक मॅनेजर विजय त्रिबंक खेडेकर (वय-49, रा. ओंकार हाऊसिंग सोसायटी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या राहत्या इमारतीसमोर असताना आरोपींनी त्यांना पिस्तूल सदृश्य हत्यार दाखवून त्यांच्या पाकीटातून 1 हजार रूपये, बँकेचे आयकार्ड काढून घेतले. तसेच त्यांना दगड मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मी मरेल, असे म्हटले. आरोपींनी तु मर असे म्हणून त्यांच्या दिशेने दगड भिरकवला. त्यांनी दगड चुकविल्यानंतर तो दगड फिर्यादी यांच्या मोटारीला लागून मागील काच फुटली. यामध्ये त्यांचे 10 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. पोलीसांनी आरोपींना तत्काळ अटक केले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेतील आरोपींनी पिंपळे गुरव येथे एका गॅरेज चालकाला हत्यार दाखवून त्याच्या खिशातील 5 हजार रूपये काढून घेतले आहेत. याप्रकरणी गॅरेज चालक मौहमत सुबहान यामीन शेख (वय-27, रा. बोपोडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Sangvi Crime News : बॅकेच्या मॅनेजरला पिस्तूल दाखवून लुटले; दोघांना अटक










Leave a Reply