Pimpri Crime News : अंगावर थुंकल्याचा बहाणा करत हॉटेल व्यावसायिकाला लुटले
Pckhabar- रिक्षातून जाणार्या एका हॉटेल व्यावसायिकाला तुम्ही माझ्या अंगावर थुंकला असून ते धुवून द्या, मला सॉरी म्हणा असे म्हणून रिक्षा अडवत त्यांच्याकडील सोन्याची चैन, अंगठी, रोख रक्कम असा 80 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोरवाडी येथे घडली.
विकास जयराम पाठक (वय-34, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाठक हे बुधवारी सायंकाळी रिक्षातून जात होते. आरोपींनी रिक्षा आडवून तुम्ही माझ्या अंगावर थुंकला असून ते धुवून द्या, मला सॉरी म्हणा असे म्हणून दोघांनी त्यांच्याकडील सोन्याची चैन, अंगठी, रोख रक्कम असा 79 हजार 300 रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. फौजदार सुर्यवंशी तपास करत आहेत.










Leave a Reply