Sad News: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Pckhabar-अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे आज (गुरुवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये या बातमीने खळबळ उडाली आहे.
वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तो टीव्ही शो बिग बॉस -13 चा विजेता होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतून तो लोकप्रिय झाला. सिद्धार्थचा मृतदेह मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. येथे त्याचे शवविच्छेदन केले जाईल.










Leave a Reply