Chinchwad News : गांधीपेठ तालीम मित्रमंडळाकडून संग्रहालयाला मदतनिधी
Pckhabar- चिपळूण येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी झाल्याने तेथील सुप्रसिद्ध लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या संस्थेच्या ग्रंथालय आणि दुर्मिळ वस्तुसंग्रहालयाचे खूप नुकसान झाले. चिंचवड येथील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन 25 हजार रुपयांचा मदतनिधी सुपुर्द केला.
याप्रसंगी संस्थेच्या ग्रंथपाल गौरी भोसले तसेच मित्रमंडळाचे अंकुश इंगळे, संदीप जंगम, महेश गावडे, राहुल वाघुले, विपुल नेवाळे यांची उपस्थित होते.
अनेक वर्षे मेहनत आणि चिकाटीने एकेक दुर्मीळ वस्तू गोळा करून उभारलेल्या संग्रहालयातील खालच्या मजल्यात पाणी, चिखल साठल्याने त्यांतून त्या वस्तू स्वच्छ करणे, दुरुस्त करणे, त्यांची पुन्हा मांडणी करणे याचबरोबर पुन्हा नव्याने कपाटे बनविणे इत्यादी कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर
या प्रसंगी गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण या संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला.










Leave a Reply