Pimpri News : ‘गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है’; राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिकेवर हल्लाबोल

Pimpri News : ‘गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है’; राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिकेवर हल्लाबोल

Pckhabar- ‘गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है’, ‘भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशी जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना 1 लाख 18 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या सर्व आरोपींना सोमवारीच जामीन मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून  महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *