Pune -Lonavala Local News : पुणे-लोणावळा लोकल फेऱ्यांत आजपासून वाढ
Pckhabar-लोणावळा-पुणे मार्गावर सध्या चार लोकल धावत असून, या मार्गावर आणखी एक लोकल वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आज (बुधवार) पासून ही जादा लोकल सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे-लोणावळा या मार्गावर सुमारे ४० हून अधिक लोकलच्या फेऱ्या नियोजित होत्या. मात्र, गतवर्षी आलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रवासी सेवा स्थगित करण्यात आली. तर ऑक्टोबरपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावत होत्या. परंतु मागील आठवडाभरापासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार सध्या लोकलच्या चार फेऱ्या होतात. या लोकलच्या संख्येत आजपासून वाढ करण्यात येणार आहे.
पुणे लोकल लोणावळा येथून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, ७ वाजून ५५ मिनिटांनी ती पुणे येथे पोहोचणार आहे. तर, पुण्याहून रात्री ८ वाजता लोकल सुटणार असून, लोणावळा येथे ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचणार आहे.










Leave a Reply