Pawana Dam News : पवना धरणात 98.58 टक्के पाणीसाठा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. पवना धरण परिसरात 24 तासात 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 98.58 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड, मावळवासियांच्या आणि शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पवना धरण परिसरात 1 जूनपासून 2 हजार 142 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 1577 मिलीमीटर पावसाची नोंदणी झाली होती.
गतवर्षी आज अखेर 98.58 टक्के इतका तर यावर्षी 99.58 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 0.85 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तर एक जूनपासून धरणात 66.99 टक्के पाणीसाठा वाढला आहे.
💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *59मि.मि.*
💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *2142मि.मि.*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 1577
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *98.58% टक्के*
💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 98.58% टक्के*
💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *0.85% टक्के*
💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *66.99% टक्के*










Leave a Reply