Dehu News : योग वर्ग पुर्ण केलेल्या साधकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव
Pckhabar-योग विद्या धाम, देहू शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या योग प्रवेश वर्गाची नुकतीच सांगता झाली. हा वर्ग पूर्ण केलेल्या 11 साधकांचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
हा कार्यक्रम देहूगाव येथील संत कृपा मंगल कार्यालय येथे पार पडला. देहूगाव प्रा.आ.केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव, अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल देहूच्या प्राचार्या डाॅ.कविता अय्यर, डाॅ. प्रमोद लोहर सर,आणि डॉ.शिल्पाताई नारायणन यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख दत्तात्रय भसे,
प्रा. विकास कंद यावेळी उपस्थित होते.
योग अध्यापक संघर्ष राजमाने आणि कु.आरतीताई काळोखे यांनी या साधकांना 1 महिना प्रशिक्षण देऊन आयुष मंत्रालय मान्यता प्राप्त हा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला.
सेवाभावनेतून एक समृद्ध, आनंदी, निरोगी व सुंदर माणूस घडविण्यासाठी योग विद्या धामचे कार्य गेल्या 15 वर्षापासून भसे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरू आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले.










Leave a Reply