Dehu News : मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे श्री संत तुकाराम महाराज यांच्या महाव्दारासमोर आंदोलन

Dehu News : मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे श्री संत तुकाराम महाराज यांच्या महाव्दारासमोर आंदोलन

Pckhabar-उद्धव ठाकरे सरकारने धार्मिक स्थळे तातडीने उघडी करावीत यासाठी आज ( सोमवार) देहू शहरात आंदोलन करण्यात आले.

कोरोनाचा गैरफायदा घेत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांची सर्वप्रकारे मुस्कटदाबी करण्याचा चंग बांधलेला दिसतो. त्यामुळेच ऐन सणासुदीला मंदिरं, प्रार्थनास्थळ बंद करण्याची दुर्बुद्धी यांना सुचतेय. भारतीय जनता पक्ष या वृत्तीचा तीव्र निषेध करत आला आहे आणि करत राहील.

या आंदोलन प्रसंगी बाळासाहेब काळोखे उपाध्यक्ष पुणे जिल्हा, सुहास गोलांडे माजी पंचायत समिती सदस्य हवेली, शहराध्यक्ष ‌मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल, माजी उपसरपंच संतोष हगवणे , युवा मोर्चा अध्यक्ष अनिरूद्ध काळोखे, उपाध्यक्ष सचिन काळोखे, संभाजी टिळेकर उपाध्यक्ष मावळ भाजपा, व्हाईस चेअरमन नारायण तात्या पचपिंड, सचिन मराठे, सरचिटणीस सागर मुसूडगे, युवा उपाध्यक्ष प्रविण हगवणे, कार्याध्यक्ष रायबा उर्फ प्रकाश मोरे, उमेश शिंदे, शशीकांत टिळेकर, सत्यवान जाधव, संजय जंबुकर, सत्यवान जाधव, राजाभाऊ बुचूडे, आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *