Pimpri News : ‘या’ अटीवर स्थायी समितीचे सभापती लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मंजूर
Pckhabar-होर्डिंगच्या टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी दहा लाख रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. काही अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे (50, रा. भोसरी), त्यांचे पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (50, रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (51, रा. वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया ( 38, रा. धर्मराजनगर) यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, फिर्यादी आणि गुन्हयाशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येण्याच्या अटीवर तसेच प्रत्येकी 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.










Leave a Reply