Dehu News : ‘संकल्प वसुंधरेच्या संवर्धनाचा, ध्यास ऑक्सिजन निर्मितीचा अंतर्गत 81 वृक्षांचे रोपण

Pckhabar-संकल्प वसुंधरेच्या संवर्धनाचा, ध्यास ऑक्सिजन निर्मितीच्या अंतर्गत गुरुवर्य श्री पुंडलिक महाराज गरुड आणि अक्षयभाई झेंडे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 81 फळ वृक्षांचे रोपण करण्यात आला.
हा कार्यक्रम दिलदोस्ती सोशल फाउंडेशन श्री क्षेत्र देहू, श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्ट इंदुरी, आणि अक्षय झेंडे मित्र परिवाराच्या वतीने आज (रविवार) रंगनाथ इस्टेट शिव- नारायण झेंडे पाटील नगर परंडवाल स्पोर्ट्स क्लब शेजारी, जुना पालखी मार्ग श्रीक्षेत्र देहूगाव येथे संपन्न झाला. याप्रसंगी इंदुरी येथील श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक महाराज गरुड, देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षप्रकाश हगवणे, दिलदोस्ती सोशल फाउंडेशनचे सर्व सभासद ,अक्षय झेंडे पाटील, माजी नगरसेवक मनोज खानविलकर, सदस्य यांच्यासह सुमारे 150 नागरिक उपस्थित होते.
देहू राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश भाऊ हगवने, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष योगेश मोरे, उद्योजक योगेश परंडवाल, प्राध्यापक विकास कंद या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व शुभेच्छा गुरुवर्य पुंडलिक महाराज गरुड यांना दिल्या.
अक्षय भाई झेंडे म्हणाले, आयुष्यात देवाने जे दिले आहे. त्यामध्ये आपण समाधानी आहोत. आयुष्यात चांगले आई- वडील, पत्नी, मुले, चांगला मित्र परिवार असणे गरजेचे असते. पैसा येतो आणि जातो, कोरोना कालावधीत अनेक पैश्यावाले खाली आलेले पाहिले आहेत. ऑक्सिजनसाठी एक- एक जीव कसा तडफडत होता. हे अनेकांनी पाहिले आहे.
यामुळे आपण दुसऱ्यांना उपदेश देण्यापेक्षा काही तरी करण्याचा विचार मनात आला. त्यामुळे घरी असताना संकल्प वसुंधरा संवर्धनाचा एक लेख लिहिला. हा लेख सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. हा लेख वाचून झाडे लावण्यासाठी अनेक जण पुढे आले. पहिल्याच टप्प्यात 89 झाडे लावण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 116 झाडे लावली आणि ऑक्सिजन पार्क उभे राहिले. याच ऑक्सिजन पार्कमध्ये श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक महाराज गरुड सर्व शिष्यांना घेऊन आले, हा भाग्याचा दिवस असल्याचे अक्षय भाई झेंडे म्हणाले.
अक्षय भाई झेंडे पुढे म्हणाले” कोरोना सारख्या जागतिक महामारीशी दोन हात करताना आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणे, ही काळाची गरज आहे. वृक्ष हे मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देते, पर्यावरणाचे संतुलन राखते, ध्वनी, वायू, जल प्रदुषण रोखते, कार्बनडाय ऑक्साइड शोषुण घेते, जमिनीची धूप रोखते, निरोगी आरोग्य जगण्यासाठी शुद्ध हवा पुरवठा करते, जैविक विविधता जोपसते, तापमान वाढ रोखते, निसर्ग सौंदर्य फुलविते असे अनेक महत्त्व वृक्ष लागवडीचे आहेत. याच उद्देशाने 81 फळ वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे”.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवानेते सोमनाथ भाऊ चव्हाण व आभार श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे सभासद अमर गावडे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक विशाल भाई परदेशी, अक्षयभाई झेंडे दिलदोस्ती सोशल फाउंडेशन श्री दत्तात्रय कानिफनाथ सेवा ट्रस्ट यांनी केले.










Leave a Reply