देहूगावात आज सहा कोरोनाचे नवे रूग्ण; एकाचा मृत्यू
Pckhabar- देहूगावात आज (शुक्रवार) कोरोनाच्या सहा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देहूत आजपर्यंत 185 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. तर आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 139 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 42 जणांवर उपचार सुरू आहेत.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
शुक्रवारी कोरोनाच्या 6 नव्या रूग्णांची नोंद झाली असून एका रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. देहू परिसरात आत्तापर्यंत 185 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.यापैकी 139 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 42 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 26 रूग्णांना लक्षणे नसून 16 रुग्णांना लक्षणे आहेत. 15 रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.










Leave a Reply