Maval News: अनिकेत घुले यांना ‘शिवनिश्चल पुरस्कार’ जाहीर
Pckhabar-नाशिक येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या दरवर्षी देण्यात येणार ‘शिवनिश्चल पुरस्कार’ यंदा युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक पै. अनिकेत घुले यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या ५ सप्टेंबरला देवळाली, नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत घुले यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे.
घुले यांनी कोरोना महामारी आणि लॉकडाऊन काळात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका आणि परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याची मदत केली होती. नुकत्याच कोकणात महाड आणि चिपळूण परिसरात आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांसाठीही त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. घुले यांनी युवा सेनेच्या माध्यमातून तीन ट्रक मदत पूरग्रस्तांसाठी पोहोच केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुणे आणि मावळ युवा सेनेच्या वतीने घुले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.










Leave a Reply