Pimpri News : ’रियल मी’ मोबाईल शोरूमचे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Pimpri News : ’रियल मी’ मोबाईल शोरूमचे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते उद्घाटन
Pckhabar-भारतातील तरूणांना त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला मोबाईलचे वेड लागले आहे. सध्याच्या या तंत्रज्ञान युगात मोबाईलमध्ये क्रांती झाली आहे. 5 जी सारख्या प्रगतशील मोबाईलची सुविधा देखील झाली असून ही बाब लक्षात घेता पिंपरीतील रियल मी मोबाईल शोरूममधून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून निश्चित याचा लाभ या शहरातील नागरिक घेतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

पिंपरी, कॅम्पातील साई चौक याठिकाणी रियल मी मोबाईल शोरूमचे उद्घाटन पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या व्यवसायात तरूण वर्ग येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पवार म्हणाले, जागतिकीकरणामध्ये काम करत असताना अनेक स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. या स्पर्धेला मात करण्यासाठी तरूण वर्ग सक्षम असून आपल्या देशात देखील या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ही बाब लक्षात घेता रियल मी मोबाईल शोरूमच्या माध्यमातून अमित आसवाणी या तरूण उद्योजकाने हे धाडस केले आहे. त्याबद्दल त्याचेही अभिनंदन करतो. त्यांच्या या व्यवसायाबद्दल त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या समारंभास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष डब्बू आसवाणी, माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका निकिता कदम, माजी नगरसेवक हरेश आसवाणी, गुरूबक्ष पहेलानी, प्रभाकर वाघेरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, उद्योजक राजू आसवाणी, प्रकाश आसवाणी, कंपनीचे संचालक शहाजी मलिक, विभागीय व्यवस्थापक संतोष बासा, शाखा व्यवस्थापक धिरेंद्र सिंग, विक्री व्यवस्थापक विनय सोनी, फारूक प्रमोटर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *