Pimpri News : संस्कार प्रतिष्ठान राबविणार पर्यावरणपुरक गणेशोत्सव अभियान

Pimpri News : संस्कार प्रतिष्ठान राबविणार पर्यावरणपुरक गणेशोत्सव अभियान
Pckhabar- कोरोनाच्या संकटावर मात करत येणारा गणेशोत्सव पर्यावरणपुरक कसा होईल व गणेश विसर्जन पर्यावरणपुरक कसे होईल, याकडे महापालिकेचे विशेष लक्ष असणार आहे. यासाठी संस्कार प्रतिष्ठान शहरामध्ये  पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. संस्कार प्रतिष्ठान पुर्ण ताकदिनिशी पालिकेसोबत असेल अशी ग्वाही प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका आयुक्ता राजेश पाटील यांना दिली.

महापालिका आयुक्त पाटील यांच्यासोबत पर्यावरणपूरक गणेशोत्सव संदर्भात संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या सोबत नुकतीच महापालिकेत एक बैठक घेण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड, उपाध्यक्ष शब्बीर मुजावर, सचिव भरत शिंदे, खजिनदार मनोहर कड, अरुण कळंबे उपस्थित होते.
या बैठकीत कोरोनाच्या संकटावर मात करत येणारा गणेशोत्सव पर्यावरणपुरक कसा होईल व गणेश विसर्जन पर्यावरणपुरक कसे होईल या विषयावर बराच वेळ चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *