Chikhali Crime News: सोन्याचे ब्रेसलेट, गॅस शेगडी आणली नाही म्हणून विवाहितेचा छळ
Pckhabar- लग्नात मानपान केला नाही, माहेराहून पतीसाठी सोन्याचे ब्रेसलेट, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, घराच्या बांधकामासाठी 20 लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लोणी काळभोर येथे घडला.
आनंद संजय मोहिते, संजय चंद्रसेन मोहिते, पुष्पा संजय मोहिते, अमोल संजय मोहिते, अंकिता अमोल मोहिते (सर्व रा. आनंदसागर बंगला, कदम वस्ती, लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहामध्ये सासरच्या मंडळींचा मानपान केला नाही, पतीसाठी सोन्याचे ब्रेसलेट, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, घराच्या बांधकामासाठी 20 लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारिरीक छळ केला. फिर्यादी यांच्या वडिलांचा अपमान करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांचे सोने आरोपींनी घेऊन अपहार केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.
Chikhali Crime News: सोन्याचे ब्रेसलेट, गॅस शेगडी आणली नाही म्हणून विवाहितेचा छळ










Leave a Reply