Bhosari Crime News : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक
Pckhabar- एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने हातचलाखी करून महिलेचे एटीएम घेवून परस्पर 40 हजार रूपये काढून फसवणूक केली. हा प्रकार आळंदी रोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये गुरूवारी दुपारी पावणेएक वाजता घडली.
याप्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांच्या जाऊ आळंदी रोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने मदत करण्याच्या बहाणा करून हातचलाखीने त्यांचे एटीएम घेतले. त्या एटीएमव्दारे त्यांच्या खात्यातून 40 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
Bhosari Crime News : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक










Leave a Reply