ACB Reid News : शासकीय रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीसाठी लाच घेणाऱ्याला अटक
Pckhabar- कोरोना प्रतिबंधक लस मोफत असतानाही 1 हजार 800 रूपयांची लाच मागून 1 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई चाकण येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी करण्यात आली.
सचिन अरुण शिंदे (वय- ३८) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 28 वर्षीय तरूणाने तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
चाकण येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आरोपी हा मदतनीस म्हणून काम करत असतो. लसीकरण अंतर्गत लसीकरण मोफत असताना तक्रारदार व त्यांचे मित्र यांना दुसरी लस देण्यासाठी आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येकी ३००/- रूपये प्रमाणे प्रथम १,८००/- रूपये व तडजोडीअंती १,०००/- रूपये लाचेची मागणी करून स्वीकारली.
आरोपीला अटक करून विशेष न्यायालय, खेड येथे हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
अलका सरग, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे, श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.
लाच मागितल्यास
हेल्पलाईन नंबर
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. अॅन्टीकरणान ब्युरो, पुणे
दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४ २६१३२८०२ २६०५०४२३
३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे ७०७५३३३३३३ ४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९३०९९७७०










Leave a Reply