Bhosari News : … तर बैलगाडा घेऊन रस्त्यावर उतरू ;  बैलगाडा मालक संघटनेचा इशारा

Bhosari News : … तर बैलगाडा घेऊन रस्त्यावर उतरू ;  बैलगाडा मालक संघटनेचा इशारा

Pckhabar-बैल हा हिंस्त्र प्राणी नसून पाळीव प्राणी आहे. शेतकरी व बैलगाडा मालक हे बैलावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. गेल्या सात वर्षांपासून बैलगाडा शर्यती बंद असूनही शर्यतीच्या बैलांना सर्व बैलगाडा मालक बैलांचा सांभाळ करत आहेत. शर्यती बंद असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. त्यामुळे येत्या एक महिन्यात बैलगाडा शर्यतीवरील बंदी न उठविल्यास पुणे जिल्ह्यातील सर्व गावात आंदोलन करण्याचा इशारा बैलगाडा मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीच्या चर्चेसाठी चर्‍होली येथे बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांची नुकतीच श्री वाघेश्वर महाराज मंदिरात बैठक पार पडली. यावेळी चर्‍होलीचे पोलीस पाटील रामराव तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव आदी गाडामालक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात दरवर्षी भरवण्यात येत होत्या. मात्र, गेल्या सात वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याची जोरदार मागणी होत आहे. बैल हा हिंस्त्र प्राणी नसून पाळीव प्राणी आहे. शेतकरी व बैलगाडा मालक हे बैलावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. शर्यती बंद असूनही गाडा मालक बैलांचा सांभाळ करत आहेत. शर्यती बंद असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून सरकारने पुणे जिल्ह्यात ठराविक घाटामध्ये बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच येत्या एक महिन्यात बैलगाडा शर्यतीवरील बंदी न उठविल्यास पुणे जिल्ह्यातील सर्व गावात आंदोलन करण्याचा इशारा बैलगाडा मालक संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *